संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ही एक केंद्र पुरस्कृत योजना असून ती जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत 11.10.2021 च्या शासन निर्णयानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहे. राज्य पातळीवर या योजनेची अंमलबजावणी राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM) (https://wsso.in/) मार्फत केली जाते.
योजनेचा इतिहास:
- ग्रामीण भारतासाठीची पहिली स्वच्छता योजना 1954 मध्ये भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भाग म्हणून सुरू करण्यात आली.
- त्यानंतर केंद्र सरकारने 1986 मध्ये केंद्रीकृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम (CRSP), ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व महिलांन सुरक्षितता आणि सन्मान मिळावा हा उद्देश ठेवून सुरू केला.
- 1999 पासून, संपूर्ण स्वच्छता अभियान (TSC) अंतर्गत मागणी-आधारित दृष्टिकोन स्वीकारण्यात आला.
- 1 एप्रिल 2012 पासून, निर्मल भारत अभियान (NBA) सुरू करण्यात आले. निर्मल भारत अभियानाचे उद्दिष्ट निर्मल ग्राम पंचायत निर्माण करणे होते.
सद्यस्थितीतील स्वच्छता कार्यक्रम:
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – I (2014-2019):
- 2 ऑक्टोबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) चा शुभारंभ केला.
- उद्दिष्ट: ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे, स्वच्छता राखणे , आरोग्यमान वाढवणे आणि उघड्यावर शौचविधीस आळा घालणे .
- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण ग्रामीण भारत “हागणदारी मुक्त करणे ” हे उद्दिष्ट होते.
- एप्रिल 2018 मध्ये ग्रामीण महाराष्ट उघड्यावरील शौचविधीपासून मुक्त (Open Defecation Free (ODF)) करण्यात आला असून राज्याने शौचविधीपासून मुक्त (Open Defecation Free (ODF)) चा दर्जा प्राप्त केला.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – II (2020-21 ते 2025-26):
- उद्दिष्ट:
- हागणदारी मुक्त ची (Open Defecation Free-ODF ) स्थिती टिकवणे.
- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे गावातील स्वच्छता सुधारणे, आणि ODF प्लस गाव निर्माण करणे.
- ODF प्लस गावासाठी पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत :
- हागणदारी मुक्त ची ( Open Defecation Free – ODF) स्थिती टिकवणे.
- घनकचरा व्यवस्थापन करणे
- सांडपाणी व्यवस्थापन करणे
- दृश्य स्वरूपातील स्वच्छता (कचरा, सांडपाणी साचलेले नसणे, प्लास्टिक टाकावू वस्तू न असणे)
हागणदारी मुक्त अधिक ( ODF प्लस ) ची श्रेणी:
- Aspiring: ODF स्थिती टिकवणारे गाव व घनकचरा/ सांडपाणी व्यवस्थापन असलेले.
- Rising: ODF स्थिती टिकवणारे गाव आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन दोन्ही असलेले.
- Model: ODF स्थिती टिकवणारे गाव, दोन्ही प्रकारचे व्यवस्थापन असून दृश्य स्वरूपातील स्वच्छता जपणारे व माहिती प्रसार करणारे.
घटक व निधी वितरण:
- वैयक्तिक शौचालय बांधणी:
- नव्याने निर्माण झालेल्या आणि शौचालय नसलेल्या लाभार्थी कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देणे.
- वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यावर रु 12,000 प्रोत्साहन अनुदान मंजूर आहे.
- सार्वजनिक स्वच्छता संकुल (CSC):
- सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी एकूण रु 3.00 लाख निधी, यापैकी SBM (ग्रामीण) अंतर्गत रु 2.10 लाख आणि 15 वा वित्त आयोग अंतर्गत रु 0.90 लाख अनुदान मंजूर आहे.
- घनकचरा व्यवस्थापन (Solid waste Management) :
-
- घरगुती व सार्वजनिक स्तरावरील कचरा कुंडी , कचरा संकलन आणि वाहतूक वाहन , कंपोस्टिंग युनिट्स, वर्मी कंपोस्ट, कचरा वर्गीकरण शेड इ.घटकांचा समावेश होतो.
- 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांसाठी : रु 45 प्रति व्यक्ती
- 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी: रु 60 प्रति व्यक्ती
- सांडपाणी व्यवस्थापन (Grey Water Management ):
- वैयक्तिक व सामुहिक स्तरावर शोष खड्डा बांधकाम, विविध सांडपाणी व्यवस्थापन तंत्रज्ञाने इ. घटकांचा समावेश होतो.
- 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांसाठी : रु 660 प्रति व्यक्ती
- 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी : रु 280 प्रति व्यक्ती
- प्लास्टिक कचरा व्यवस्थापन:
- तालुका स्तरावर /गावांच्या समूहासाठी प्रकल्पास मान्यता
- या अंतर्गत प्लास्टिक कचरा साठवण, वर्गीकरण, शेडिंग, बेलींग, ग्रॅन्युलेशन व विल्हेवाट यांचा समावेश.
- प्रत्येक प्रकल्पासाठी प्रती तालुका रु 16 लाख निधी.
- गोंबरधन प्रकल्प (GOBAR-Dhan):
- प्रत्येक जिल्ह्यासाठी रु 50 लाख निधी मंजूर.
- मैला गाळ व्यवस्थापन (FSM):
- एकल खड्डा किंवा सेप्टिक टँक मधील मानवी मैल्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी जिल्हा / समूह स्तरावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प राबविला जातो.
- प्रति व्यक्ती रु 230 निधी मंजूर .
लाभार्थी:
..
फायदे:
..