बंद

    जल जीवन मिशन

    • तारीख : 27/01/2025 -

    जल जीवन मिशन (JJM) ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत १५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू केलेली एक दूरदर्शी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे नियमित, सुरक्षित, पिण्यायोग्य व पुरेशा प्रमाणात पाणी पुरविणे. “हर घर जल” या तत्त्वज्ञानावर आधारित हे अभियान ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यात परिवर्तन घडवून आणणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करते.

    या योजनेत पाणीपुरवठा केवळ नियमित असणे पुरेसे नसून ते सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी असणे आवश्यक आहे, यावर भर दिला जातो. पाण्याची गुणवत्ता हा या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक असून त्याच्या तपासणी व देखरेखीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक योजनेच्या नियोजनाच्या टप्प्यात पाण्याचे स्त्रोत काळजीपूर्वक निवडले जातात, जेणेकरून ते निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार असतील आणि ग्रामीण जनतेच्या आरोग्याचे रक्षण होईल.

    स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी गावपातळीवर फिल्ड टेस्ट किट्स (FTKs) उपलब्ध करून दिल्या जातात. ग्रामपंचायत, ग्रामपाणी व स्वच्छता समितीचे सदस्य आणि महिला प्रशिक्षणानंतर स्वयंपूर्णपणे पाण्याची गुणवत्ता तपासू शकतात. राज्य व जिल्हा पातळीवर रासायनिक आणि जीवाणूविषयक तपासण्या करण्यासाठी पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याशिवाय, IEC (माहिती, शिक्षण व संवाद) उपक्रमांतर्गत सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती केली जाते, ज्यामुळे “हर घर जल-सुरक्षित जल” हे उद्दिष्ट दृढ होते.

    ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची शाश्वतता प्रभावी संचालन व देखभालीवर अवलंबून आहे. केवळ योजना पूर्ण करून हस्तांतरित करणे पुरेसे नाही. त्यामुळे स्थानिक मनुष्यबळ घडविण्यासाठी Skilling व Training वर विशेष भर देण्यात येतो, ज्यामुळे प्रणाली दीर्घकाळ कार्यक्षम आणि विश्वासार्ह राहील.

    या कौशल्य विकास उपक्रमांद्वारे प्रशिक्षित व्यक्तींना “नळ जल मित्र” म्हणून प्रमाणित केले जाते. हे स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा प्रणालीचे व्यवस्थापन व देखभाल करतात. त्यांच्या उपलब्धतेमुळे त्वरित दुरुस्त्या होतात, देखभालीचा खर्च कमी होतो आणि बाह्य यंत्रणांवरील अवलंबित्व घटते. या दृष्टिकोनामुळे समुदायाचा सहभाग वाढतो, योजनांची शाश्वतता टिकते आणि ग्रामीण पाणी प्रशासन अधिक मजबूत होते.

    महाराष्ट्रातील जळ जीवन मिशन (JJM) स्थिती पुढीलप्रमाणे आहे:-

    जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची संख्या :

     

    मंजुरी वर्ष एकूण योजना जिल्हा परिषद (ZP) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भूजल सर्वेक्षण व विकास संस्था (GSDA)
    2019-2020 1,917 1,890 27 0
    2020-2021 2,508 2,506 2 0
    2021-2022 22,599 22,327 271 1
    2022-2023 16,161 15,544 617 0
    2023-2024 8,291 8,247 0 44
    2024-2025 0 0 0 0
    2025-2026 0 0 0 0
    एकूण योजना (सर्व मंजुरी वर्षे) 51,560 50,570 945 45

    स्रोत : IMIS B15 अहवाल.

    घरगुती नळजोडणीचे आच्छादन स्थिती :

    आर्थिक वर्ष एकूण ग्रामीण घरकुले एकूण नोंदविलेल्या घरगुती जोडण्या पाईपद्वारे जलपुरवठा (PWS) असलेल्या घरकुलांचे %
    2019-2020 1,38,54,445 54,06,781 39.03
    2020-2021 1,42,36,135 91,03,747 63.95
    2021-2022 1,46,08,532 1,03,52,578 70.87
    2022-2023 1,46,73,257 1,09,85,193 74.87
    2023-2024 1,46,72,395 1,25,01,423 85.2
    2024-2025 1,46,78,590 1,31,19,974 89.38
    2025-2026 1,46,78,590 1,32,10,394 90

    स्रोत : IMIS J36 अहवाल

    हर घर जल स्थिती :

    आर्थिक वर्ष

    एकूण तालुके

    हर घर जल तालुके

    एकूण ग्रामपंचायती हर घर जल ग्रामपंचायती एकूण गावे हर घर जल गावे

    नोंदविलेल्या

    प्रमाणित

    नोंदविलेल्या

    प्रमाणित

    नोंदविलेल्या

    प्रमाणित

    1/4/2021 351 20 0 27,880 4,491 0 40,495 6,934 0
    1/4/2022 351 3 0 27,863 4,979 0 40,327 8,149 0
    1/4/2023 351 4 0 27,863 5,848 665 40,297 9,480 1,230
    1/4/2024 351 15 2 27,844 10,522 6,322 40,297 16,766 10,677
    1/4/2025 351 23 4 27,852 12,176 7,468 40,297 19,256 12,477
    24/08/2025 351 25 4 27,852 12,445 8,061 40,297 19,634 13,376

    स्रोत : IMIS J8 अहवाल

    लाभार्थी:

    हि योजना व्यक्तिगत लाभार्थी योजना नाही

    फायदे:

    ग्रामीण नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करणे

    अर्ज कसा करावा

    हि योजना व्यक्तिगत लाभार्थी योजना नाही