स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ही केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येत आहे.
योजनेचा इतिहास
ग्रामीण भागामध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने 1986 मध्ये स्वच्छतेवर आधारित अभियानाला सुरुवात केली. 2003-04 पासून केंद्र शासनाने संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले. 1 एप्रिल 2012 पासून या अभियानाचे निर्मल भारत अभियान असे नामकरण करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर 2014 पासून त्याचे नाव बदलून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ठेवण्यात आले.
वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन अनुदान
निर्मल भारत अभियानांतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी रु. 4600/- अनुदान देण्यात येत होते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रोत्साहन अनुदान वाढवून रु. 12000/- करण्यात आले, ज्यामध्ये 60:40 प्रमाणात केंद्र व राज्याचा हिस्सा होता.
मुख्य उद्दिष्टे
- ग्रामीण भागात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम.
- उघड्यावर मलविसर्जनाला प्रतिबंध करणे.
- स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवणे.
पुरस्कार
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळवले आहेत:
- क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अहवाल 2016-17: सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांचा समावेश.
- स्वच्छता दर्पण 2016-17 पुरस्कार: सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व वर्धा.
- स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा 2019: महाराष्ट्र राज्य तृतीय क्रमांक.
कोविड-19 अनुषंगाने उपाययोजना
कोविड-19 संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी स्वच्छतेवर भर देण्यात आला.
स्वच्छाग्रहींच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आले व त्यांना स्वच्छता साधने पुरविण्याबाबत सूचना दिल्या गेल्या.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2
2020 मध्ये केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशनाचा दुसरा टप्पा सुरू केला. यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे.
- वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान.
- सार्वजनिक शौचालय बांधकाम.
- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन.
क्र | कामे |
---|---|
१ | लहान गावांमध्ये ठोस कचरा व्यवस्थापन |
२ | मोठ्या गावांमध्ये ठोस कचरा व्यवस्थापन |
३ | लहान गावांमध्ये ग्रे पाणी व्यवस्थापन |
४ | मोठ्या गावांमध्ये ग्रे पाणी व्यवस्थापन |
५ | प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट (प्रति ब्लॉक १) |
६ | गोबरधन प्रकल्प |
७ | मलनिर्गम व्यवस्थापन |
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) संबंधित केंद्र शासनाचे संकेतस्थळ विभागाच्या संकेतस्थळाला लिंक करण्यात आले आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
ग्रामीण भागात अशुध्द पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणा-या रोगांमुळे पिडीत असलेल्या ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हा ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, पर्यायाने जीवनस्तर, उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा ग्रामस्थांचा/जनतेचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग कार्यक्रमात करुन घेण्याची प्रभावी तरतूद कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत असावी, ग्रामीण जनतेस हा कार्यक्रम आपला वाटावा व त्याचे महत्त्व पटून त्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा या दृष्टिकोनातून, सन 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. तसेच सन 2002-03 पासून स्वच्छतेशी व ग्रामविकासाशी निगडीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणा-या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षीसे देण्याचा उपक्रमही सुरु करण्यात आला आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात सुटसुटीतपणा, अधिक सोपेपणा, पारदर्शकता व या अभियानाची व्याप्ती वाढवून महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना संदर्भात शासन स्तरावरुन यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय अधिक्रमित करुन नवीन दिनांक २५ एप्रिल, २०१८ च्या शासन निर्णयान्वये व त्यानंतर दिनांक 23 जुलै, 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे