जल जीवन मिशनचा तपशील
केंद्र शासन पुरस्कृत महत्वाकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रमाची सन 2019 मध्ये सुरवात करण्यात आली असून त्याद्वारे सन 2024 पर्यंत सर्व 100 टक्के ग्रामीण कुटुंबांना “हर घर नल से जल” या तत्वाने कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (एफ. एच. टी. सी.-कार्यात्मक घरगुती नळ जोडणी) द्वारे शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबद्ध आहे.
सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण व शाश्वत पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
दि. 12/11/2028 रोजीच्या स्थितीनुसार राज्यातील ग्रामीण भागातील एकुण 1,46,78,864 घरे/कुटुंबांपैकी 1,27,96,983 (87.18%) इतक्या घरांना/कुटुंबांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (एफ. एच. टी. सी.-कार्यात्मक घरगुती नळ जोडणी) देण्यात आलेली आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 36,88,064 इतक्या घरांना नळ जोडणी (एफ. एच. टी. सी.-कार्यात्मक घरगुती नळ जोडणी) देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी दि. 31.03.2024 रोजी अखेरपर्यंत इतक्या 15,08,562 घरांना/कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाकडून राज्याकरीता सन 2024-2025 या वित्तीय वर्षाकरीता रू. 5352.93 कोटी इतके नियतव्यय काल्पनिकरित्या मंजुर केले असल्याबाबत केंद्र शासनाने दि. 28.03.2024 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
त्यापैकी केंद्र शासनाने आतापर्यंत रू. 1605.879 कोटी (केंद्र हिस्सा) इतका निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या एस. एन. ए (एस्क्रो करा) खात्यात उपलब्ध करून दिला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सन 2024-2025 या चालू आर्थिक वर्षाकरीता राज्य हिश्श्याच्या अनुषंगाने एकूण रू. 4052.50 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत रू. 1568.4086 कोटी (राज्य हिस्सा) इतका निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करण्यात आला आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमाकरीता आर्थिक वर्ष 2023-2024 केंद्र व राज्य हिश्श्याचा एकूण रू. 16,579.87 कोटी इतका निधी खर्च (आयएमआयएस नुसार) झाला.
राज्याच्या एकत्रीत कृती आराखड्यानुसार (आयएमआयएस) जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यात एकूण 43195 योजना घेण्यात आल्या आहेत.
सदर योजना जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत आहेत. सदर योजनांच्या प्रगतीची दि. 20.08.2024 रोजीची सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे:
Saturation Plan नुसार योजनांची संख्या | अंदाजपत्रक तयार | तांत्रिक मंजुरी प्रदान | प्रशासकीय मंजुरी प्रदान | निविदा प्रसिद्ध | कार्यारंभ आदेश प्रदान | कामे सुरू | कामे पूर्ण |
---|---|---|---|---|---|---|---|
42266 | 42266 (100%) | 42266 (100%) | 42235 (99.93%) | 42235 (99.93%) | 42199 (99.84%) | 30582 (72.36%) | 11532 (27.28%) |
अद्याप सुरू न झालेली कामे | 85 (0.20%) |
संपृक्तता योजना नुसार योजनांची संख्या | अंदाजपत्रक तयार | तांत्रिक मंजुरी प्रदान | प्रशासकीय मंजुरी प्रदान | निविदा प्रसिद्ध | कार्यारंभ आदेश प्रदान | कामे सुरू | कामे पूर्ण | अद्याप सुरू न झालेली कामे |
---|---|---|---|---|---|---|---|---|
929 | 929(100%) | 929(100%) | 929(100%) | 929(100%) | 929(100%) | 866(93.22%) | 63 | 0 |
अ.क्र. | बाव | उद्दीष्ट | साध्य | टक्केवारी |
---|---|---|---|---|
1. | कार्यात्मक घरगुती नळ जोडणी | 1,46,78,864 | 1,27,96,983 (दि.12.11.2024 च्या सद्यस्थितीनुसार) | 87.18% |
2. | हर घर जल गावे (प्रमाणित) | 40,289 | 11584 | 28.75% |
3. | गाव कृती आराखडा (VAP) | 40,289 | 40191 | 99.76% |
4. | गाव पाणी व स्वच्छता समिती (व्हीडब्ल्यूएससी) | 40,289 | 40173 | 99.71% |
5. | जिल्हा कृती आराखडा (डीएपी) | 34 | 34 | 100% |
6. | शाळा नळ जोडणी | 77,725 | 76,809 | 98.82% |
7. | हर घर जल गावे (प्रमाणित) अंगणवाडी नळ जोडणी | 90,661 | 89147 | 98.33% |
लाभार्थी:
हि योजना व्यक्तिगत लाभार्थी योजना नाही
फायदे:
ग्रामीण नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करणे
अर्ज कसा करावा
हि योजना व्यक्तिगत लाभार्थी योजना नाही