बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    उद्दिष्ट :-

    राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करणे. त्यासंबंधित धोरणात्मक निर्णय घेवून अंमलबजावणी करणे.
    तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते संबंधित सर्व कार्ये हाताळणे.

    कार्ये :-

    १. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग(खुद्द) ची आस्थापना, विभागाच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,राज्य पाणी व स्वच्छता मिशन (पूर्वीचे नाव- पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था) यांची आस्थापना.
    २. पिण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांबाबत धोरण ठरविणे, पाणी पुरवठा स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
    ३. पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविणे.
    ४. जल जीवन मिशन कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2, अटल भूजल योजना याबाबत समन्वयन व संनियंत्रण करणे.

    विभागाची विषयसूची

    विषयसूची पाहा- विभागाची विषयसूची

    विभागीय मुख्यालये

    मुख्यालय – ७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रूग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, क्रॉफर्ड मार्केट जवळ, मंत्रालय, मुंबई-४००००१.
    अधिकृत संकेतस्थळ – http://water.maharashtra.gov.in

    क्षेत्रिय कार्यालये

    1. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
    2. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
    3. राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई.