प्रस्तावना
राज्यातील शहरांना व गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी परिणामकारकरित्या पुरवण्यासाठी शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र. शाकानि १०९५ / सीआर-२८९/१८ (रवका), दिनांक ९ नोव्हेंबर १९९५ अन्वये “पाणी पुरवठा व स्वच्छता” या स्वतंत्र प्रशासकीय विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत माननीय श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील हे विभागाचे मंत्री आहेत आणि माननीय श्रीमती. मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर ह्या राज्यमंत्री आहेत. विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रधान सचिव श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.) कार्यरत आहेत.