महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

Label
Label

आमच्याविषयी

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय, मुंबई. महाराष्ट्र शासन यांचा प्रशासकीय विभाग आहे. सध्या प्रभारी मा.मंत्री, श्री.गुलाबराव रघुनाथ पाटील आहेत. विभागाचे प्रधान सचिव, श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.) आहेत.

निर्मिती

सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.निकाळ १०१५/सीआर २८९/१८(र.व.क.), दिनांक ९ नोव्हेंबर , १९९५ नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या प्रशासकीय विभागाची निर्मिती झाली. त्यामुळे हे वर्ष विभागाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

कामे

राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करणे, त्यासंबंधीत धोरणात्मक निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते संबंधित सर्व कार्ये हाताळण्यात येतात.

कार्यक्षेत्र

  • १) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग(खुद्द) ची आस्थापना, विभागाच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रण, महाराषट्र जीवन प्राधिकरण, जलस्वराज्य टप्पा-२, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांची आस्थापना.
  • २) पिण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांबाबत धोरण ठरविणे, पाणी पुरवठा स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • ३) पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविणे.
  • ४) जलस्वराज्य टप्पा-२ व पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था कार्यालयांचे कामांचे समन्वयन व संनियंत्रण करणे.
  • ५) जल जीवन मिशन कार्यक्रम समन्वयन व संनियंत्रण करणे.

विभागाची विषयसूची

संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (link subject list)

विभागीय मुख्यालये

मुख्यालय -

७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रूग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, क्रॉफर्ड मार्केट जवळ, मंत्रालय, मुंबई-४००००१

अधिकृत संकेतस्थळ - http://water.maharashtra.gov.in

क्षेत्रिय कार्यालये

  • १) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
  • २) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
  • ३) जलस्वराज्य टप्पा-२,बेलापूर, नवी मुंबई
  • ४) पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, बेलापूर, नवी, मुंबई